Sunday, November 21, 2010

जाग........

A very beautiful poem by Mangesh Padgaonkar...It has a beautiful meaning hidden inside it.. I just read it and found worth sharing. The words are harcore marathi literature and hard to understand but read it twice and try to understand the meaning...

का असे वाटले होते
तु असशिल वादळ वारा?
उधळशील सार्या व्रत्ति
श्वासानी सैरावैरा ?

वाटले स्पर्श होताच
थरथरेल हे आकाश
ढाळतील पाने झाडे
होवुनीया मुक..हताश!

मी मिटुनि घेतले डोळे
पन शांत निगुढच सारें
तंद्रित कांपरया हळव्या
अन होते वाहत वारे !

कजवा एक अंधारी
शोधित भिरभिरे कांही
ती उघडमिट चमचमती
अन दुसरे काही नाही !

भुरभुरे दुर कोठेसा
बांसरीचा उतःकट सुर
वेलीपरि लावलि होती
नदितीरावर हुरहुर !

र्सवस्व लपेटित माझे
तो सुर थरथरे भवती
ह्या अश्या क्षणी जाग्रुतिच्या
कधी शुद्ध हरपलि नव्हति !

..मज जाग पहाटें आली
झिळमिळत्या तरल प्रकाशीं
त्रुप्तिने लवले होतें
आकाशं संथ क्षितिजाशी.........

.................................मंगेश पाडगांवकर(23-12-53)